Gondia Accident: गोंदियात ट्रक आणि पोलिसांच्या व्हॅनला भीषण अपघात, एका पोलिसाचा मृत्यू तर २ जखमी

Gondia Truck And Traffic Police Van Accident: गोंदियामध्ये भरधाव ट्रकने ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.
Gondia Accident: गोंदियात ट्रक आणि ट्राफिक पोलिसांच्या व्हॅनला अपघात, एका पोलिसाचा मृत्यू तर २ जखमी
Gondia Truck And Traffic Police Van AccidentSaam Tv

शुभम देशमुख, गोंदिया

गोंदियामध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॅनला भीषण अपघात (Traffic Police Van Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मसुलकसा घाटात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये पोलिसांच्या व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा (Gondia Accident) तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Gondia Accident: गोंदियात ट्रक आणि ट्राफिक पोलिसांच्या व्हॅनला अपघात, एका पोलिसाचा मृत्यू तर २ जखमी
Parbhani Accident: साईबाबांच्या दर्शनाहून परतताना भाविकांवर काळाची झडप; दोघांचा जागीच मृत्यू तर १२ गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील राष्टीय महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाला. पोलिसांचे एक पथक हे देवरी तालुक्यात गस्तीवर होते. त्याचवेळी देवरीकडून नागपूरच्या दिशेने लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने पोलिसांच्या व्हॅनला पाठीमागून धडक दिली. या ट्रकमधील लोखंडी अँगल पोलिसांच्या व्हॅनवर कोसळले. एका पोलिसाच्या पोटात अँगल घुसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मनीष बहेलीया असे या ट्राफिक पोलिसाचे नाव असून त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Gondia Accident: गोंदियात ट्रक आणि ट्राफिक पोलिसांच्या व्हॅनला अपघात, एका पोलिसाचा मृत्यू तर २ जखमी
Stampede Accident in India: हाथरस चेंगराचेंगरीनंतर जुन्या जखमा भळभळल्या; महाराष्ट्रातही 2005 मध्ये घडलं होतं भयंकर, देशभरातील घटनांमध्ये आतापर्यंत किती मृत्यू?

या अपघातामध्ये सहायक पोलिस निरीक्षक दिनेश लिल्हारे हे जखमी झाले. मात्र सुदैवाने या अपघात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनचे चालक योगेश बनोटे यांना किरकोळ इजा झाल्याने त्यांनीच आपल्या पोलिस शिपायला व्हॅनमधून बाहेर काढून एका खासगी वाहनाने देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिन्ही पोलिसांना गोंदियातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना मनीष बहेलिया या पोलिसाचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास गोंदिया पोलिसांकडून सुरू आहे.

Gondia Accident: गोंदियात ट्रक आणि ट्राफिक पोलिसांच्या व्हॅनला अपघात, एका पोलिसाचा मृत्यू तर २ जखमी
Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात; ट्रक दुभाजक तोडून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com