Gondia Fire News: शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्यासह लाखोंचा माल जळून खाक

Fire at Gondia's Pindkepar Area: लाकडी घर असल्याने आग आटोक्यात आली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.
House Caught Fire at Gondia
House Caught Fire at GondiaGondia Fire

शुभम देशमुख 

Pindkepar News

गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे विद्युत शॉर्ट सर्किटमुळे सकाळी घराला अचानक आग (Gondia) लागल्याची घटना घडली. या घटनेत घरातील सर्व साहित्य व विद्युत उपकरणे जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.

House Caught Fire at Gondia
Manmad News : मेहुणे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार, नेत्यांना केली गावबंदी; दुष्काळी अनुदानासाठी ग्रामस्थांचा निर्धार

उन्हाळ्यात प्रामुख्याने आग लागल्याच्या घटना अधिक घडत असतात. पिंडकेपार येथील रमेश पटले यांचे मालकीचे मातीचे घर असून अचानक घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दरम्यान, शेजाऱ्यांनी आगीवर (Fire) नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी घर असल्याने आग आटोक्यात आली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

House Caught Fire at Gondia
ATM Crime : हातचलाखीने एटीएमची अदलाबदली करत लुबाडणूक; अंतरराज्य गुन्हेगारांना अटक

आगीत लाखोंचे नुकसान 

लाकडी घराला लागलेल्या आगीत यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने रौद्ररुप घेत घरातील साहित्यांसह जनावरांचा चारा, लाकडी चिरान व इतर साहित्य जळून खाक झाले. यामुळे रमेश पटले यांचा संसार उघड्यावर पडला आहे. याचा पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com