Gondia News : भयंकर! गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकली, महिलेचा जागेवरच गेला जीव

Gondia Accident News : पिठगिरणी मशीनच्या पट्यात ओढणी अडकल्याने महिलेचा शीर कापलं गेलं आणि शरीरापासून धड वेगळं झालं. सदर घटनेमुळे नवेगावबांध परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Gondia Accident News
Gondia News Saam TV

शुभम देशमुख, गोंदिया

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झालाय. ही महिला पिठगिरणीत धान्य दळण्यासाठी आली होती. त्यावेळी काळाने तिच्यावर घाला घातला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gondia Accident News
Gondia Accident : गोंदिया- कोहमारा मार्गावर बसला अपघात, 12 प्रवासी जखमी, 2 गंभीर

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धान्य दळत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील ओढणी मशीनच्या पट्यात अडकली. त्यामुळे तिच्या गळ्याला फास बसला. या महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र घटना घडली तेव्हा तेथे कोणीही नव्हते. पिठगिरणी मशीनच्या पट्यात ओढणी अडकल्याने महिलेचा शीर कापलं गेलं आणि शरीरापासून धड वेगळं झालं. सदर घटनेमुळे नवेगावबांध परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आझाद चौकातील हर्षल उजवने यांची पिठगिरणी आहे. नीतु हर्षल उजवने असं मृत महिलेचं नाव असून त्या नेहमीप्रमाणे दळण दळण्यासाठी गिरणीवर आल्या होत्या. आज पिठगिरणीतच आपला मृत्यू लिहिलाय याची पुसटशीही कल्पना या महिलेच्या मनात नसेल आली.

महिलेच्या इतका भयंकर पद्धतीने मृत्यू झाल्याने उजवने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती नवेगावबांध पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक योगीता चाफले करत असून मृतक महिलेला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.

Gondia Accident News
Gondia Bribe Case : लाच मागणारा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; थकीत बिलावर स्वाक्षरीसाठी मागितली १० टक्के रक्कम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com