Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? गिरीष महाजनांनी दिली माहिती

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
Girish Mahajan
Girish MahajanSaam TV
Published On

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा भार आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसेच मंत्रिपदासाठी इच्छुक अनेक आमदारांचं लक्षही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे.

Girish Mahajan
Dasara Melava 2022 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीची बॅनरबाजी; 'मातोश्री'बाहेर लक्षवेधी बॅनर

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. यावर वरिष्ठ निर्णय घेत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Girish Mahajan
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाण्याची नारायण राणेंची तयारी; म्हणाले...

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार स्थापन झालं. जून अखेरीस मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

गिरीश महाजन यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर फडणवीस– शिंदे सरकार कोसळेल; या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत असल्याने यापैकी कुणाचा दसरा मेळावा जोरदार होणार यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्ट केलं आहे. घोडा मैदान दूर नसून लवकरच आपल्याला समजेल की कुणाचा दसरा मेळावा यशस्वी व जोरदार झाला हे लवकरात समजेल असं त्यांनी म्हटलं.

शिंदेंच्‍या दसरा मेळाव्‍याला भाजपचे कुणीही जाणार नाही

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपाच कुणीही जाणार नसल्याचे यावेळी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. दसरा मेळाव्यात यापूर्वी देखील भाजपच कुणी गेले असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे यंदा देखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाजपच कोणी जाणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही ठरलं असेल तर मला कल्पना नसल्याचे देखील महाजन यांनी स्पष्ट केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com