GBS Syndrome Outbreak: राज्यात जीबीएसचा कहर; विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रातही GBS शिरला

GBS Syndrome In Maharashtra : पुण्यापाठोपाठ आता जीबी सिंड्रोमनं राज्यात आपले हातपाय परसलेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही या आजाराने शिरकाव केलाय. नेमके कुठे-कुठे जीबीएसचे रुग्ण आढळलेत.
GBS Syndrome Outbreak
GBS Cases NewsChatGPT
Published On

केजल नगरे, साम टीव्ही

पुण्यापाठोपाठ आता जीबी सिंड्रोमनं राज्यात आपले हातपाय परसले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही जीबीएसनं शिरकाव केल्यामुळे संकट वाढलंय. नेमके कुठे कुठे जीबीएसचे रुग्ण आढळले आणि त्याचा सामना कसा करणार यावरचा विशेष रिपोर्ट. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबी सिंड्रोमने थैमान घातले आहे. अवघ्या दहा दिवसांत .रुग्णांची संख्या १११ वर गेली आहे.

GBS Syndrome Outbreak
GB Syndrome News : जीबीएसनं वाढवलं पुणेकरांचं टेंशन! जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर, एकाच दिवसात 28 जणांना लागण

ही आकडेवारी दररोज वाढतेय. पुण्यापाठोपाठ आता नागपूर, सोलापूर, कोल्हापुरातही GBSने शिरकाव केला आहे.

राज्यात जीबीएसचं थैमान

पुणे

111 रुग्ण

नागपूर

6 रुग्ण

कोल्हापूर

2 रुग्ण

सोलापूर

2 संशयित रुग्ण

तर एका संशयिताचा मृत्यू

GBS Syndrome Outbreak
GBS News : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव, कोल्हापूरमध्ये २ रूग्ण आढळले

एका बाजूला रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनही आता सतर्क झालं आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही जीबी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान पुण्यात GBSची लागण झालेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. याची दखल घेत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतही जीबीएस सिंड्रोमवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेत पाहुयात.

GBS Syndrome Outbreak
GBS Syndrome : GBS ला घाबरून जाऊ नका, हाऊस टू हाऊस सर्वे करणार, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रूग्णसंख्या वाढीमुळे प्रशासन सतर्क

जीबीएस संसर्गजन्य नाही

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी विशेष व्यवस्था

जीबीएसवर ठोस अशी उपचारपध्दती नसली तरी प्रचलित उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात असं आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com