GBS virus detected in health minister Prakash Abitkar’s district : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या जिल्ह्यात जीबीएस आजाराने शिरकाव केलाय. पुणे, सोलापूर, नागपूरनंतर कोल्हापूरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूरमध्ये जीबीएसचे दोन रूग्ण आढळले आहेत. जीबीएसचे रूग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून उपाय योजना सुरू केल्या आहेत.
पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबीएसने आता कोल्हापूरमध्ये शिरकाव केलाय. कोल्हापूरमध्ये जीबी सिड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत. कोगनोळी येथील साठ वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील सहा वर्षाच्या बाळाला जीबीएसची लागण झाली आहे.
सी पी आर रुग्णालयात महिन्याला पाच ते सहा जीबी सिंड्रोम चे रुग्ण दाखल होऊन ठणठणीत बरे होत असल्याचा सीपीआर प्रशासनाने दावा केलाय. पुण्यानंतर आता कोल्हापुरातही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.