Nandurbar GBS : नंदूरबारमध्ये जीबी सिंड्रोमचा शिरकाव; दोघांपैकी एक रुग्ण व्हेंटिलेटरवर

Nandurbar GBS Syndrome update : नंदूरबारमध्ये जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोघांपैकी एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. दोघेही रुग्ण बालक आहेत. जीबीएस आजाराने नंदूरबारकरांची चिंता वाढली आहे.
gbs
two suspected GBS patients found SaamTV
Published On

नंदूरबार : राज्यातील विविध जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा शिरकाव सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातही दोन रुग्ण आढळले आहेत. नंदूरबारमध्ये जीबीएसचे अचानक दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. या दोन रुग्णांमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नंदूरबारमध्ये जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळल्याची घटना घडली आहे. नंदूरबारमधील दोन रुग्ण हे लहान बालक आहेत. दौघांपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. चिंताजनक असलेल्या लहान बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ज्या गावात रुग्ण आढळले, त्या ठिकाणाच्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

gbs
GBS Update News: नागरिकांनो काळजी घ्या! GBS व्हायरसचा विळखा वाढता वाढे, नगरमध्ये चिमुकली संशयित रुग्ण

जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये २० आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. जीबी सिंड्रोम आजारासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक अशा उपायोजना केल्या जात आहे. जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळल्याने नंदूरबारकरांची चिंता वाढली आहे. नंदूरबारमधील बालकांमध्ये जीबी सिंड्रोम आढळल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

gbs
Pune GBS : पुण्यात जीबीएस फोफावतोय, ४७ जण ICU मध्ये, रूग्णसंख्या १६३ वर

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १५० पार

पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या जीबीएस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. आज पुन्हा रुग्णसंख्येत भर पडल्याचं समोर आलंय. पुण्यातील जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा १६६ वर पोहचला आहे. जीबी सिंड्रोमच्या ५ संशयित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

gbs
GBS Virus : नगरमध्ये GBS व्हायरसचे पुन्हा ४ संशयित रुग्ण, प्रशासन अलर्ट मोडवर

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज बुधवारपर्यंत १६६ जीबीएसचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी १३० रुग्णांना जीबीएस झाल्याचं निश्चित झालंय. यापैकी ३३ रुग्ण पुणे महानगरपालिका हद्दीत आहे. तर ८६ रुग्ण नव्याने पुणे महानगरपालिकेअंतर्गत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आहेत. त्याचबरोबर १९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत आहे. तर २० रुग्ण पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यातील आहेत. पुण्यातील एकूण ५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६१ रुग्ण आयसीयूत आहेत, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com