लाखो दिलो की धडकन, गौतमी पाटीलला अटक होणार....या प्रश्नाने तिच्या चाहत्यांना टेन्शनमध्ये टाकलंय. आणि हा प्रश्न पडलाय एका अपघातामुळे..आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट डीसीपीला झापल्यामुळं.....
ही नेमकी घटना काय आहे पाहूया
30 सप्टेंबरला गौतमीच्या कारची रिक्षाला धडक
नवले पुलावरील अपघातात रिक्षाचालकासह तीन जण जखमी
गौतमीच्या कारचालकाला पोलिसांकडून अटक
या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाल्यानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांनी केलेल्या अपघाताच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले. अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील होती असा आरोप करत पोलिस या प्रकरणामध्ये काही तरी लपवत असल्याचा संशय व्यक्त करत थेट चंद्रकांत पाटलांकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केलीय. आणि चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपींना आदेश दिले
चंद्रकांत पाटलांनी थेट कार जप्त करण्याचे आिण गौतमीवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकरणात पोलिसांना प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यास सांगितलंय. दरम्यान रिक्षाचालकाच्या कुटुबियांनी नेमकी काय मागणी केलीय पाहा.
गौतमी अपघातावेळी कारमध्ये होती की नाही हे पोलिस तपासात समोर येईलच. पण या अपघातानंतर पुणे पोलिसांची पुन्हा दैना झालीये. हा अपघात होऊनही पोलिसांनी या कारमध्ये नेमक कोण होतं आणि राजकीय नेता होता का.. असेल तर तो कोण होता? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..या अपघाताला 5 दिवस झाल्यानंतर आणि मरगळेंच्या नातेवाईकांच्या आरोपानंतरही गौतमीनं मौन पाळलं असेल तर यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे... त्यामुळं आता गौतमीला अटक होणार का? असाच प्रश्न निर्माण झालाय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.