Gautam Adani meets Sharad Pawar : शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam tv
Published On

Chandrashekhar Bawankule on Gautam Adani - Sharad Pawar : अनेक वर्षांपासून अदानी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे भेटीगाठी होऊ शकतात. पण या बैठकीचा अर्थ वेगळा लावणे योग्य नाही, असं महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, गौतम अदानी  आणि  शरद पवार हे चांगले मित्र आहे. राजकारणात एक व्यावसायिक चांगले मित्र राहणे अयोग्य नाही. बावनकुळे आहेत, शरद पवार यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहे, त्यामुळं ते अदानी यांना भेटले असतील.

आज उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांची भेट घेतली. या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule
Gautam Adani Meets Sharad Pawar: मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पाण्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढली होती.

याचबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हजारो केसेस आमच्यावर लावल्या. कुठल्याही आंदोलनात पोलीस ताब्यात घेतात. आंदोलनाची संमाप्ती पोलीस ताब्यात घेतात.

ते म्हणाले, नितीन देशमुख यांनी मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे. पण कुणाच्या घरावर मोर्चा घेऊन जायचं. याला पोलीस समर्थन कसं करणार. मागण्यांवर सरकार विचार करणार.

Chandrashekhar Bawankule
Tim Cook Meets Pm Narendra Modi : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, भारतात करणार गुंतवणूक, ट्वीट करत दिली माहिती

दरम्यान, भाजप नेत्यांची आज बैठक झाली. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचली की नाही. याबाबत आत्मचिंतन करण्यात आलं. प्रत्येक आदिवासी, जनजाती क्षेत्रापर्यंत जायचं आहे.

ते म्हणाले, विचार परिवाराचे लोक आजच्या बैठकीत होते. आजच्या बैठकीचा मुद्दा राजकीय नाही. सामाजिक चर्चा झाली सामान्यांच्या योजना पोहोचल्या की नाही, याबाबत आजच्या बैठकीत मंथन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com