

नवरात्रोत्सवापूर्वी महाराष्ट्रात गरबा-दांडियातील मुस्लिमांच्या सहभागावरून नवा राजकीय वाद
गरबा कार्यक्रमात प्रवेशासाठी ओळख तपासणी आणि इतर धार्मिक अटींच्या मागणीवरूनही चर्चा
नितेश राणे यांनी ‘लव्ह जिहाद’चा हवाला देत आपली भूमिका मांडली आहे.
उथळ पाण्याला खळखळाट फार, या उक्तीचा प्रत्यय यावा अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालीये. राज्यात सण-उत्सवावरून राजकीय पक्ष आमने-सामने आलेत. दहीहंडी, गणेशोत्सवातील DJनंतर आता भाजप नेत्यानं केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण झालाय. एव्हंढच नव्हे तर मिसेस मुख्यमंत्र्यांनीही या वादात उडी घेतलीये. नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.
नवरात्रोत्सवाला अजून महिना बाकी आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्रात गरबा-दांडियावरून राजकारणाला सुरुवात झालीये. भाजप मंत्री नितेश राणेंनी गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केलाय. मात्र मुस्लिमांना गरब्यात यायचंच असेल तर त्यासाठी त्यांनी थेट धर्मांतराची अट ठेवलीय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या भूमिकेला विरोध दर्शवलाय.
ऐकलंत.. या आधी गरब्यात प्रवेश करतांना आधारकार्डची सक्ती करण्याची मागणी करण्यात आली आणि आता तर नितेश राणेंनी गैर-हिंदूंना थेट घरवापसीचा सल्ला देत धर्म बदल्याचं आव्हान दिलंय. मात्र हे केवळ दंगे घडवण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप मनसे नेते अमित ठाकरेंनी केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून गरब्यात फक्त हिंदूना प्रवेश द्या अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याच आतापर्यंत दिसलंय आता खुद्द मंत्री नितेश राणेंनी थेट हिंदू व्हा आणि गरब्यात सामिल व्हा म्हटल्यानं पुन्हा धार्मिक वाद पेटण्याची शक्यता आहे. ज्या गरबा आणि दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो रुपयांचे तिकीट काढावं लागतं ते आयोजक आता गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश देणार का? की सरकार याबाबत नवी नियमावली तयार करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.