Gadchiroli Shocking News: पती-पत्नी, २ मुलं आणि मावशी २० दिवसांत ५ जणांचा मृत्यू; रहस्यमयी घटनेनं गडचिरोली हादरलं

5 Family Members Found Dead: ज्या वाहानातून रुग्णालयात दाखल झाले होते त्या वाहन चालकाचाही मृत्यू झालाय.
Gadchiroli Shocking News
Gadchiroli Shocking NewsSaam TV
Published On

Gadchiroli News:

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव बुद्रुक या गावात कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा वीस दिवसांत मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुढ वाढले आहे. एकाच कुटुंबातील आई -वडील, मुलगा- मुलगी व मावशी असे पाच जण वीस दिवसांच्या कालावधीत मृत्युमुखी पडले आहेत. (Latest Marathi News)

Gadchiroli Shocking News
Bengaluru Cyber Crime: एका खोलीत कंपनी, ८४ बँक खाती अन् ८५४ कोटींचा स्कॅम; इंजिनियर तरुणांच्या प्रतापाने पोलिसही हादरले!

22 सप्टेंबर रोजी या कुटुंबातील विजया या 43 वर्षीय महिला डोकेदुखी व थकव्यामुळे आजारी पडल्या. त्यांचे पती शंकर त्यांना कारद्वारे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र तेही आजारी पडले. 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे तर 27 सप्टेंबर रोजी विजया यांचा मृत्यू झाला. दरम्यान विवाहित कन्या माहेरी आली होती. तिचाही 08 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

तर दूरवर सिरोचा येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असलेला रोशन कुंभारे याचाही 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी महागाव येथे आलेल्या या कुटुंबातील मावशी आनंदा उराडे यांचाही 14 ऑक्टोबर रोजी मृत्यू झालाय. दरम्यान या सर्व मृत्यूचे कारण काय याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विजया आणि शंकर हे दोघेही ज्या वाहानातून रुग्णालयात दाखल झाले होते त्या वाहन चालकाचाही मृत्यू झालाय. राकेश मडावी असं मृत वाहनचालकाचं नाव आहे. अचानकपणे एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मृत्यू झाल्याने पोलिसांसह वैद्यकीय यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Gadchiroli Shocking News
Pune Crime News: गणवेश न घालता कोर्टात जाणं पडलं महागात; भूषण पाटीलवरील सुनावणीदरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्तांना नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com