Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv

Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह नेला दुचाकीवर; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह नेला दुचाकीवर; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Published on

मंगेश बांदेकर

गडचिरोली : गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे (Gadchiroli) रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क दुचाकीवर मृतदेह नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

Gadchiroli News
Jogeshwari Accident News: जोगेश्वरीत मोठी दुर्घटना! शाळेतील इमारतीचा काही भाग कोसळला; विद्यार्थ्यांमध्ये घबराट

देशात क्षयरोग निर्मुलनासाठी (Bhamragad) विशेष मोहीम चालविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे. वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे (Hospital) कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला.

Gadchiroli News
Aundha Nagnath Temple : शिवालयात १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; खेळत असताना लोखंडी गेट पडलं अंगावर

परिवाराची भटकंती 

गडचिरोली जिल्ह्यातील कृष्णार येथील गणेशला १७ जुलैला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. दरम्यान २० जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवरून आणण्याची वेळ परिवारावर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com