Crime : मैत्रीच्या नात्याला काळीमा; पैशांसाठी मित्राने केला मित्राचा खून

पैशाच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या या वादात मित्राने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आरोपी मित्राने केलेल्या हल्ल्यात शहाजी जाधव या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Crime : मैत्रीच्या नात्याला काळीमा; पैशांसाठी मित्राने केला मित्राचा खून
Crime : मैत्रीच्या नात्याला काळीमा; पैशांसाठी मित्राने केला मित्राचा खूनSaam TV
Published On

नांदेड : नांदेडमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशांच्या वादातून एका नराधम मित्राने आपल्याच जिवलग मित्राचीच हत्या केल्याची ही घटना नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) मुखेड तालुक्यातील होनवडज गावात घडली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या या वादात मित्राने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. दरम्यान आरोपी मित्राने केलेल्या हल्ल्यात शहाजी जाधव (Shahaji Jadhav) या तरुणाचा मृत्यू झाल्याने या घटनेमुळे होनवडज गावात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण -

आरोपी आणि मृत शहाजी जाधव हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. या दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीमुळे काही वाद झाला. आणि या वादातूनच आरोपी ज्ञानेश्वर जाधवने त्याचा मित्र शहाजी जाधवकडे पैशांची मागणी केली , मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला आल्यावर तुला पैसे देतो, असं शहाजीने ज्ञानेश्वरला सांगितलं होतं मात्र राग अनावर झालेल्या ज्ञानेश्वरने त्याच्या जवळच्या धारदार शस्त्राने शहाजीच्या पोटात, छातीवर वार करून त्याला ठार केलं.

Crime : मैत्रीच्या नात्याला काळीमा; पैशांसाठी मित्राने केला मित्राचा खून
'बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय, मात्र सरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करतय'

सदर हल्ल्यात शहाजी रक्तबंबाळ झाल्याने त्याच्यावरती मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला नांदेडला हलवण्यात आले. मात्र नांदेडला (Nanded) सरकारी रुग्णालयात नेताच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान या हत्तेप्रकरणी शहाजीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करत ज्ञानेश्वर जाधवला गावातून अटक करण्यात आली असून पुढील प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com