भांडे उजळून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक !

जिल्ह्याच्या अचलपुरात आज भांडे चमकून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरातून जवळपास दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
भांडे उजळून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक !
भांडे उजळून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक !अरुण जोशी
Published On

अरुण जोशी

अमरावती : जिल्ह्याच्या अचलपुरात Achalpur आज भांडे चमकून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरातून जवळपास दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत . तहसील कार्यालय रोडवरील मनीरत्न कालनीतील पेट्रोलपंप परिसरात सदर महिला आपल्या परिवारासह राहते. Fraud of Rs 1.5 lakh for a woman

महिलेचे पती राजु माथने कर्तव्यावर गेले असतांना दोन ते तीन युवक या महिलेच्या घराजवळ आले व आपल्या घरातील कोणतेही भांडे चमकवून देऊ असे सांगितले. सुरुवातीला साधे भांडे चमकवून दिल्याने महिलेचा विश्वास वाढला तेव्हा या भामट्यांनी महिलेला घरातील आणखी पितळेचे किंवा महागडे चांदी सोन्याचे भांडे असतील तर चमकवून देतो असे सांगितले.

महिलेने सोन्याचे कडे (कंगन) आणले असता सदर युवकांनी महिलेचे तीस ग्रॅमचे कंगन घेऊन ताबडतोब घटनास्थळावरून पोबारा केला. महिलेने आरडाओरड करताच काही नागरिकांनी त्यांचा पिच्छा सुद्धा केला. मात्र त्यांना पकडण्यास नागरीक असमर्थ ठरले.

भांडे उजळून देण्याच्या बहाण्याने महिलेची दीड लाखांची फसवणूक !
पहिल्याच मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल !

तात्काळ घटनेची माहीती अचलपूर पोलिसांना देण्यात आली. अचलपूर पोलिस या संदर्भात तपास करत आहेत. मात्र भांडे चमकवण्याचा बहाण्याने चोरट्यांनी पुन्हा एकदा सोन्याचा दागिन्यांवर हात साफ केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com