पहिल्याच मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल !

नागपूरात काल झालेल्या एका दिवसाच्या मुसळधार पावसानं महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळं नागपूरातील विविध भागात पाणी साचलं आहे.
पहिल्याच मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल !
पहिल्याच मुसळधार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल !Saam Tv
Published On

संजय डाफ

नागपूर : नागपूरात Nagpur काल झालेल्या एका दिवसाच्या मुसळधार पावसानं महापालिकेच्या NMC कामांची पोलखोल केली आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळं नागपूरातील विविध भागात पाणी साचलं आहे. सोबतच वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून, रस्ते जलमय झाले आहेत. महापालिका प्रशासनानं पावसाळ्या पूर्वी शहरात पाणी साचणार नाही असे दावे केले होते. मात्र, या पावसानं प्रशासनानं केलेले दावे फोल ठरविले आहेत. Due to torrential rains, water has accumulated in various parts of Nagpur

काल शहरात या मोसमातील महिला मुसळधार पाऊस पडला आहे. दिवसभरात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरले होते. शहराच्या सिव्हिल लाईन सारख्या भागातही पाणी जमा झाले होते. सिमेंट रस्ते उंच झाल्यामुळे खोलगट भागात पाणी साचत असते. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात दिवसाचं पाणी जमा होत असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी Leader of the Opposition केला आहे.

शहराच्या खोलगट भागात पाणी साचलं आहे. हे महापौरांनी Mayor मान्य केल आहे. मात्र, त्यांनी याच खापर तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे Tukaram Mundhe आणि कोविड Corona वर फोडलं आहे. तुकाराम मुंढे यांनी कामं करू दिली नाही आणि कोरोनामुळं कामं करता आली नाही, असं महापौर सांगतात. यावर त्यांनी अधिकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत.

पावसाळी पाण्याचं नियोजन Rainwater planning करण्यासाठी नागपूर महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. तरीदेखील मोठा पाऊस झाला की शहरात विविध ठिकाणी पाणी साचत आहे. सिमेंट रस्त्यामुळे पावसाचं पाणी जायला जागा नसल्याने, नागपूरातील बऱ्याच भागात पाणी साचत आहे. याचा सर्वसामान्यांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप BJP आणि प्रशासनानं एकमेकांकडे बोट न दाखवता यावर तोडगा काढावा, ही सर्वसामान्यांची भावना आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com