France Abortion Rights : मोठी बातमी! गर्भपातासाठी महिलांना कायदेशीर अधिकार; फ्रन्समध्ये ऐतिहासीक निर्णय

France Makes Abortion a Constitutional Rights : फ्रान्समध्ये दोन्ही सर्वोच्च सभागृहांमध्ये संयुक्त अधिवेशनात ऐतिहासिक विधेयकाला मंजूरी देण्यात आली. महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा पहिलाच देश ठरला आहे.
France Abortion Rights
France Abortion Rights Saam TV
Published On

France News :

फ्रान्समधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील महिलांना गर्भपातासाठी घटनात्मक अधिकार देण्यात आला आहे. मुल जन्माला घालायचं की नाही याचा संपूर्ण अधिकार महिलेला असणार आहे. तसेच कायद्याच्या चौकटीत यासाठी महिलांना अधिकार देण्यात आले आहेत.

France Abortion Rights
Car Rally France: फ्रान्समध्ये श्रीरामाचा जयघोष! रामभक्तांनी काढली भव्य कार रॅली; VIDEO व्हायरल

सोमवारी फ्रान्समध्ये दोन्ही सर्वोच्च सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात ऐतिहासिक विधेयकाला मंजूरी देण्यात आली. महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा पहिलाच देश ठरला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत गर्भपाताचा प्रस्ताव मांडला होता.

महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळावा यासाठी फ्रान्सच्या राज्यघटनेतील कलम ३४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी फ्रान्समधील नॅशनल असेम्ब्ली आणि सिनेट या संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये यावर चर्चा झाली. त्यानंतर स्वतंत्रपणे सुधारणा विधेयक बहुमताने पारित करण्यात आले. विधेयक लागू करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये तीन पंचमांश इतक्या बहुमताची गरज होती.

सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत या विधेयकाला तीन पंचमांश इतके बहुमत मिळाले आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

कोणकोणत्या कारणांमुळे होतो गर्भपात?

गर्भपाताची अनेक कारणे असतात. बहुसंख्या व्यक्ती पोषक तत्वांची कमतरता, कमकुवत गर्भाशय, संसर्ग, लैंगिक संक्रमण रोग आणि पीसीओएस अशीही गर्भपाताची काही कारणे असू शकतात.

एका महिलेला आई होण्याआधी गर्भपाताचा अधिकार असावा का? गर्भपात करायचा असेल तर तो किती आठवड्यांपर्यंत करावा? त्यासाठी किती कालावधीची परवानगी देण्यात यावी? गर्भपात कायदेशीर आहे की बेकायदेशीर? अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने चर्चा सुरू आहे. या सर्वांमध्येच आता फ्रान्समध्ये महिलांना गर्भपातासाठी घटनात्मक अधिकार देण्यात आला आहे.

France Abortion Rights
Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com