Mangaon tragedy : हळहळ! कुंडलिका नदीत बुडणाऱ्या मुलीला वाचवायला गेले, अनर्थ घडला; चौघेही बुडाले

Four Person Drown In Kundalika River: कुंडलिका नदीत चार जण बुडाले. बुडालेल्यांमध्ये २ महिला, १ तरूण आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
four drown in Kundalika river
four drown in Kundalika river Saam Tv News
Published On

रायगडच्या माणगाव तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. कुंडलिका नदीत चार जण बुडाले. बुडालेल्यांमध्ये २ महिला, १ तरूण आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. घटनेनंतर शोध आणि बचाव पथक, तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शोधकार्य सुरू केलं. दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. चौघेही नवी मुंबईतील रहिवासी असून, शिरवली येथे आजीच्या गावी ते आले होते.

माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली. कुंडलिका नदी पात्रात चार जण बुडाले. नवी मुंबई येथील रहिवासी असलेले हे चौघे जण शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. नदीवर कपडे धुण्यासाठी ते गेले होते. त्याचवेळी लहान मुलगी पाण्यात पडली. पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली. मुलीला वाचवण्यासाठी तिघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र चौघेही पाण्यात बुडाले.

four drown in Kundalika river
Raigad Crime : अनैतिक संबंधातून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या, महिलेने जेवणात विष कालवून संपवलं

दोघांचे मृतदेह सापडले

सिद्धेश सोनार ( वय २१), सोनी सोनार (वर्ष २७) यांचे मृतदेह सापडले. काजल सोनार (वय २६) आणि सिद्धी पेडेकर (वय १६) हे दोघे बेपत्ता आहेत. ते अद्याप सापडले नाहीत. अंधार पडल्यानं शोधकार्यात अडथळे आल्यानं, पुढील शोधकार्य उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनं त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहेत. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

four drown in Kundalika river
Raigad News : विदारक! मरणानंतरही फरफट, रस्त्याअभावी मृतदेह झोळीतून नेला, कुटुंबीयांची ४ किमी पायपीट

ऑगस्टमध्येही सावित्री नदीत तिघे बुडाले होते

सावित्री नदीतही ऑगस्ट महिन्यात तिघे जण बुडाले होते. ते तिघे पोहोयला गेले होते. त्याचवेळी बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. हे तिघे एका प्रार्थनास्थळी दर्शनासाठी गेले होते. तिघांनाही नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही. ते पोहोण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले. पण पुन्हा वर आलेच नाहीत. बचाव पथकाने त्यांचा शोध घेतला. त्यांचे मृतदेह हाती लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com