
छत्रपती संभाजीनगर : मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाने राज्यात आणखी एक भूकंप येणार, अशी चर्चा सुरु झाली होती. संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान शिरसाट यांनी केलं होतं. संजय शिरसाट यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात एकच प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 'एकनाथ शिंदे यांना भाजप वेगळं करतंय, या भीतीतून संजय शिरसाट यांनी गुगली टाकली असावी, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी केली आहे.
'संजय शिरसाट दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे आणि प्रयत्न करणार असे म्हणत असतील, तर त्यांनी हा विचार अगोदर का केला नाही. शिवसेना दोन विभागात का विभागली गेली. फुटायच्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मन मोकळेपणाने बोलले असते, तर त्यांनी ऐकले असते. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते. पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळे होऊ शकले नाही. मात्र भविष्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते, असे खैरे यांनी सांगितले.
'आता भाजप यांना वेगळे करण्याची भीती असल्याने या गोष्टी बोलत असतील आणि तशी गुगली टाकत असतील. संजय शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलावं. त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावं, ते ठरवतील काय करायचं, असेही खैरे यांनी पुढे सांगितले.
भाजपच्या ऑफरवर बोलताना म्हटलं की, 'मला भाजपकडून राज्यपालपदाची तर शिवसेनेकडून खासदारकीची ऑफर होती. मात्र त्यांना माहीत होतं की, मी विकल्या जाणार नाही किंवा फुटणार नाही म्हणून ते मला ऑफर देत होते. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असून मी मातोश्रीचाच आहे मी अनेक वेळा सांगितलं आणि आताही सांगतोय'.
अर्थसंकल्पावर बोलताना खैरे म्हणाले, 'आजचं बजेट हे संमिश्र आहे. नोकरवर्ग आणि व्यापाऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा आहे. बजेटला खराबही म्हणता येणार नाही आणि चांगलेही म्हणता येणार नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.