भविष्यात भाजपाचा टिळा लावून एखादा दल बदलू भाजपचा अध्यक्ष झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan latest marathi news) यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावरून धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे (former mla anil gote) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गाेटेंनी धुळ्यात प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माजी आमदार अनिल गाेटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेसमुक्त भारतपासून सुरू झालेली वाटचाल आता काँग्रेस युक्त भाजपपर्यंत येऊन पोहोचली आहे असे म्हटले आहे. भविष्यात ओरिजनल "भाजपवाला कळवा आणि हजार रुपये मिळवा" असे म्हणावे लागेल अशी खोचक टीका गाेटेंनी भाजपवर केली आहे.
त्याचबरोबर भाजपवर गोटे यांनी टीका करताना भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगार यांचे हेच श्रद्धास्थान असे देखील म्हणत भविष्यात भाजपाचा टिळा लावून एखादा दल बदलू भाजपचा अध्यक्ष झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे म्हटले. भाजपच्या विरोधक पक्षप्रवेशावर गोटे यांनी निशाणा साधला आहे. गाेटेंनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भाजपमध्ये विरोधकांचा सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशाचा समाचार घेतला आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.