Breaking News: भगर आणि शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यामुळे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Food Poisoning Nagpur: उपवासात भगर आणि शिंगाड्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे ५० हून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातून समोर आली आहे.
Food Poisoning Nagpur
Food Poisoning NagpurSaam Tv
Published On

पराग ढोबळे

Food Poisoning By Bhagar Nagpur News

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमधून विषबाधा झाल्याने अनेकजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कामठी (Kamthi) येथे ५० हून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (latest marathi news)

महाशिवरात्रीनिमित्त अनेकजणांनी भगर आणि शिंगाड्याच्या पिठाची शेव आणि भजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. मेयो रुग्णालयात 34 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. शहरातील इतर अनेक भागात (Food Poisoning Nagpur) सुद्धा काही लोकांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेण्याचे काम सुरू होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वीची घटना

महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना यापूर्वी नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली होती. एका खासगी कंपनीचे भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास जाणवला (Food Poisoning By Bhagar) होता.

रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Nagpur News) होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. अन्न आणि औषध विभागाने या घटनेची दखल घेतली आहे. कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिटमधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहेत.

Food Poisoning Nagpur
Food Poisoning: उपवासाच्या भगरीतून २० ते २५ जणांना विषबाधा; परभणी जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नंदुरबार शहरातील घटना

नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावात घराघरात शिजवलेल्या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. गावातील लोकांनी एकाच कंपनीची भगर खरेदी केली. दुपारी भगर खाल्यानंतर ग्रामस्थांना उलटी, मळमळ, आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता. जवळपास ७० हुन अधिक ग्रामस्थांना उपचारासाठी रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Food Poisoning By Bhagar And Shinagda Flour) होतं.

सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली होती. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांपुर्वी याच परिसरात शंभरहुन अधिक नागरीकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

Food Poisoning Nagpur
Processed Foods : तुम्हालाही बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची सवय आहे? जडू शकतात ३२ पेक्षा जास्त गंभीर आजार, संशोधनातून खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com