Nanded News: हदगाव तालुक्यातील ८ ते १० गावांमधील नागरिकांना विषबाधा

Food poisoning: सध्या एकादशी आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक हे मोठ्या संख्येने उपवास धरत असतात, त्यामध्ये भगर हा उपवासाचा पदार्थ खातात. काल एकादशीनिमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचे सेवन केले. त्यात अनेकांना विषबाधा झाला.
Nanded  Food poisoning:
Nanded Food poisoning: Saam Tv
Published On

Nanded Food Poisoning:

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना विषबाधा झालीय. भगर खाल्ल्याने या गावांमधील जवळपास ६० ते ७० जणांना विषबाधा झालीय. या नागरिकांवर उपजिल्हा आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व नागरिकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलीय.(Latest News)

सध्या एकादशी आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक हे मोठ्या संख्येने उपवास धरत असतात त्यामध्ये भगर हा उपवासाचा पदार्थ खातात. काल एकादशीनिमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचे सेवन केले. पण काहींना रात्री तर काहीना पहाटे उटल्या, मळमळ असा त्रास सुरू झाला. मोठ्या संख्येने नागरिकबाधित झाले. विषबाधा झालेल्या नागरिकांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालय, तसेच काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भंडाऱ्यात १५० हून अधिक भाविकांना विषबाधा

उपवासाचे पदार्थ खाऊन अनेकांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नंदुरबारमधून मोठी बातमी समोर आलीय. नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडाऱ्यातून १५०अधिक भक्तांना विषबाधा झाली होती. बाळू मामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागला होता.

उपवासाच्या फराळातून ५०० महिला-पुरूषांना विषबाधा

लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली होती. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उपवासाच्या फराळाचे प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना विषबाधा झाली होती.

Nanded  Food poisoning:
Buldhana Devotees Poisoning : उपवासाच्या फराळातून ५०० महिला-पुरूषांना विषबाधा; अनेकांची प्रकृती चिंताजनक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com