लातूर व पुणे येथून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त; एकाला अटक

२ लाख ७० हजारांचा मुद्देमाल, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थापन केलेल्या विशेष पथकाने लातूर व पुणे येथून चोरलेल्या पाच मोटारसायकली जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, लातूर (Latur) निलंगा, अहमदपूर आणि पुणे (Pune) जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली या आरोपीने पोलिसांना (Police) दिली आहे.

हे देखील पाहा -

चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित आरोपीने मोटारसायकल घरी लपवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील घरी पोलिसांनी छापा टाकला असता, तुकाराम ईश्वर आवळे (२१) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा, अहमदपूर तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज व भोसरी या ठिकाणांवरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

Latur News
आधी शिवसैनिकावर फेकली काळी शाई, नंतर केला जीवघेणा हल्ला; नाशिकमधील भयंकर घटना

यावेळी त्याने पोलिसांना त्याच्या घरातील मोकळ्या जागेत दुचाकी ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोटारसायकलच्या चेसिस नंबर इंजिन नंबरची पडताळणी केली असता चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन द्रोणाचार्य, सहायक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार राम गवारे, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, बंटी गायकवाड, नाना भोंग, चालक प्रवीण चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com