छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं मंदिर, कुठे उभारण्यात आलं? कधी आहे लोकापर्ण सोहळा? जाणून घ्या

Chhatrapati Shivaji Maharaj Temple: अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सहा फूट उंच मूर्ती अखंड कृष्णशिला दगडातून तयार केली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Temple
Chhatrapati Shivaji Maharaj Templegoogle
Published On

शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले भव्य मंदिर महाराष्ट्रात उभारले गेले आहे. हे मंदिर भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाड्यात उभारले गेले असून, १७ मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी त्याचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन होईल. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे, ज्यांनी अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती घडवली होती. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आदर्श निर्माण करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची सहा फूट उंच मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून तयार करण्यात आली आहे. मंदिर परिसरात त्यांच्या जीवनावर आधारित इतिहास समाजाला कळावा यासाठी ३६ शिल्पचित्रे साकारण्यात आली आहेत, ज्यात प्रत्येक प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे. हे मंदिर शिवप्रेमींना एक तीर्थस्थळ म्हणून समर्पित होईल.

Chhatrapati Shivaji Maharaj Temple
Marathi Language Crisis : मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का? महाराष्ट्रातचं मराठी माणसावर अरेरावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत या मंदिराचे भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. सात वर्षांच्या मेहनतीनंतर हे मंदिर पूर्ण झाले असून, संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. तालुका आणि जिल्ह्यात या मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Temple
Maharashtra Politics: राजीनाम्यानंतरही पाय खोलातच; खंडणीची मागणी मुंडेंच्या कार्यालयात, पाहा स्पेशल रिपोर्ट

शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराबाबत विचारणा होत आहे. शिवाजी महाराजांच्या योगदानामुळे हिंदू धर्माचे मंदिर सुरक्षित राहिले. ते राजे जेव्हा आदिलशहा आणि निजामशहाच्या आक्रमणांविरोधात उभे ठाकले त्याआधी परिस्थिती वेगळी असती. म्हणूनच, आम्ही हे मंदिर उभारले आहे, जे राजांच्या महत्त्वपूर्ण कार्याची आठवण करून देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com