खळबळजनक ! नदीत वाहत आली हाताची बोटं, पोलिसांचे शोध कार्य सुरु

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधील सुसेरी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला
खळबळजनक ! नदीत वाहत आली हाताची बोटं, पोलिसांचे शोध कार्य सुरु
खळबळजनक ! नदीत वाहत आली हाताची बोटं, पोलिसांचे शोध कार्य सुरुSaam Tv
Published On

खेड : रत्नागिरी rantangiri जिल्ह्यातल्या खेड khed तालुक्यामधील सुसेरी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या गावातून वाहणाऱ्या नारंगी नदीच्या narangi river किनाऱ्यावर माणसाच्या हाताची बोटे, अवयव आणि मांसाचे तुकडे सापडल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सुसेरी नंबर २ या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई येथून नातेवाईकाच्या कार्याला आलेल्या ६५ वर्षीय बाळकृष्ण भागोजी करबटे हे रविवार दिनांक २४ या दिवशी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले होते. सकाळी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरवात केले होते. नारंगी नदीच्या किनाऱ्यावर स्मशानभूमी नजीक हाताचे कट झालेले बोट आणि माणसाचे तुकडे मिळून आले आहेत.

हे देखील पहा-

यामुळे हा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार, खेड पोलिसांनी सकाळपासून नदीच्या डोहात मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. आता हे तुटलेले बोट आणि मासाचा तुकडा नेमके कोणाचे आहे? बाळकृष्ण करबटे रात्रीपासून बेपत्ता आहेत. त्यांचा आहे की अन्य कोणाचा आहे का? त्यांचा असेल, तर त्यांचा घातपात कोणी आणि कशाकरिता केला असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण भागोजी करबटे हे मुंबईत वास्तव्याला असतात नातेवाईकाच्या कार्यविधीकरिता ते गावी आले होते. रविवार दिनांक २४ दिवशी गावातील सर्व जण भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच बघत असताना 'मी जाऊन येतो, असे बोलून ते घराच्या बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत बाळकृष्ण करबटे न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा सगळीकडे शोध सुरू केला. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नारंगी नदीच्या काठावर गावच्या स्मशानभूमी नजीक शोध सुरू असताना, हाताचे एक बोट तुटलेले सापडले.

खळबळजनक ! नदीत वाहत आली हाताची बोटं, पोलिसांचे शोध कार्य सुरु
महाराष्ट्र Share Market मध्येही आघाडीवर; 7 महिन्यात 1 कोटी गुंतवणूकदार

तसेच नदीच्या दिशेने फरफटत नेहल्याच्या खुणा देखील त्याठिकाणी सापडले आहेत. तिथेच पुढे काही अंतरावर मासाचे तुकडे देखील सापडले आहेत. गावकऱ्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात कळवले, त्यानुसार खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीच्या डोहात एक बॅटरी देखील तरंगताना आढळली आहे. ती नेमकी कोणाची याविषयी काही माहिती मिळाली नाही. सुसेरी नंबर दोन खालचिवाडी नजीक आढळून आलेल्या माणसाचे मांस आणि अवयव नक्की कोणाचे याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com