महाराष्ट्र Share Market मध्येही आघाडीवर; 7 महिन्यात 1 कोटी गुंतवणूकदार

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया NSE मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येने काल ५ कोटींचा आकडा पार करण्यात आला
महाराष्ट्र Share Market मध्येही आघाडीवर; 7 महिन्यात 1 कोटी गुंतवणूकदार
महाराष्ट्र Share Market मध्येही आघाडीवर; 7 महिन्यात 1 कोटी गुंतवणूकदारSaam Tv
Published On

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया NSE मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येने काल ५ कोटींचा आकडा पार करण्यात आला आहे. स्टॉक एक्सचेंजने Stock Exchange सांगितले की, ३ कोटी रजिस्टर्ड गुंतवणूक दारांवरून ४ कोटींपर्यंतचा टप्पा १५ महिन्यामध्ये पार करण्यात आला होता. त्यानंतरचे १ कोटी गुंतवणूकदार फक्त ७ महिन्यापेक्षा कमी दिवसात एनएससीवर नोंदवले आहेत.

यामुळे एनएससीने ५ कोटी गुंतवणूकदारांचा आकडा पार करण्यात आला आहे. एक्सचेंज बरोबर रजिस्टर्ड युनिक क्लाइंट कोडची एकूण संख्या ८.८६ कोटी इतकी आहे. क्लाइंट एकाहून अधिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करू शकतात. एनएससीचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांनी सांगितले आहे की, आजपर्यंत नोंदणी झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या मैलाचा दगड आहे.

हे देखील पहा-

सरकार, SEBI आणि सर्व स्टॉकहोल्डर्स याच्या तर्फे देण्यात आलेले प्रोडक्ट, थेट ग्राहक ऑनबोर्डिंग प्रोसेस, इन्वेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता या सर्वांचा हा एकत्र परिणाम आहे. आम्ही पुढील ३- ४ वर्षात १० कोटी युनिक इन्वेस्टरचे Target लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. देशातील २ डिपॉजिटरी CDSL आणि NSDL कडे एकूण ७.०२ कोटी डिमॅट अकाउंट आहेत. यामध्ये एका गुंतवणूकदाराकडे एका पॅन क्रमांकावर अनेक डीमॅट अकाउंट एकत्र होऊ शकतात.

महाराष्ट्र Share Market मध्येही आघाडीवर; 7 महिन्यात 1 कोटी गुंतवणूकदार
मला गर्भपात करण्यास भाग पाडले; बाबर आझमवर गर्लफ्रेंडने लावले आरोप

उत्तर भारतीय राज्यांनी एनएससीवर नवीन गुंतवणूकदारांमध्ये ३६ टक्क्यांचे योगदान देण्यात आले आहे. पश्चिमेच्या राज्यांमध्ये ३१ टक्के, दक्षिणेच्या राज्यांमद्ये ३० आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये १३ टक्के लोकांची हिस्सेदारी आहे. राज्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात Maharashtra सर्वाधिक म्हणजेच १७ टक्के शेअर मार्केट गुंतवणूकदार राहणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश १० टक्के आणि गुजरात ७ टक्के इतके राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com