

बीड : अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच महेश मांजरेकरांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील बँड कलाकारांनी केली आहे. यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड कलाकारांना आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
महेश मांजरेकर यांच्या काळे धंदे या वेब सीरिजच्या माध्यमातून बँड कलाकारांचा अवमान करण्यात आल्याचं कलाकारांच म्हणणं आहे. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कलाकार आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. (Beed News)
काळे धंदे या वेब सीरिजमध्ये एका सीनमध्ये बँड पथकातील कलाकांना शिवीगाळ करत त्यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांना तुच्छ वागणूक या सीनमध्ये देण्यात आली आहे. यामुळे बँड कलाकरांच्या भावना दुखावल्या आहेत.
बँड कलाकारांनी म्हटलंय की, जोपर्यंत महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात अशाचा प्रकारे आंदोलन करण्यात येईल. बँड कलाकारांना अपमान केल्यामुळे हे आंदोलन केलं जात आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.