क्रूरतेचा कळस! खाटेवर दिव्यांग मुलीनं केलं शौच, बापाने गळा आवळून केली हत्या

चंद्रपूर जिल्ह्यात शामनगरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.
Chandrapur Crime News
Chandrapur Crime NewsSaam Tv

चंद्रपूर : जिल्ह्यात शामनगरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. बापानेच दिव्यांग मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केल्यामुळं नराधम बाप संतापला आणि रागाच्या भरात त्याने मुलीचा गळा आवळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तपास सुरु करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विजय बारापात्रे (46) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Father killed disabled girl)

Chandrapur Crime News
माँ, तेरे कदमों में जन्नत है! भर रस्त्यात राहुल गांधींनी सोनिया गांधींच्या बुटाची बांधली लेस

चंद्रपूर जिल्ह्यात शामनगरमध्ये धक्कादायक घटना घडलीय. नराधम बापाने दिव्यांग मुलीने खाटेवर शौच केले म्हणून तिची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती बिघडल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केले.

Chandrapur Crime News
Greece Boat Accident : ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना, १७ जणांचा मृत्यू

मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषीत केलं. मृत पावलेल्या मुलीच्या गळ्यावर जखमा असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल गोपाले यांनी दिली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com