Nagpur News: दगडी कोळसा काढण्यासाठी केला स्फोट, धक्क्याने घर कोसळलं; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Nagpur House Collapsed: या घटनेनंतर स्थानिक गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी केली आहे.
Nagpur House Collapsed
Nagpur House CollapsedSaam tv
Published On

Nagpur Crime News: नागपूरमध्ये (Nagpur) दगडी कोळसा (coal) काढण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटामुळे बसलेल्या हादऱ्यात घर कोसळले. या दुर्घटनेमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कांदरी-कन्हान येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी केली आहे.

Nagpur House Collapsed
Dahi Handi 2023: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या वरळीत आशिष शेलार 'परिवर्तना'ची दहीहंडी उभारणार

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या कांदरी-कन्हान येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घर कोसळून याठिकाणी बाप-लेकीचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील जमिनीतील दगडी कोळसा काढण्यासाठी वेकोली या सरकारी कंपनीकडून नेहमी ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे आसपासच्या गावात याचे हादरे बसतात.

Nagpur House Collapsed
Akola News : 'लम्पी' चा धसका; पठाणपुरात जनावरांच्या बाजारास बंदी, जत्रा, प्रदर्शनावर निर्बंध

आज देखील वेकोली कंपनीकडून कोळसा काढण्यासाठी अशाच प्रकारचे ब्लास्टिंग करण्यात आले होते. या ब्लास्टिंगमुळे कांदरी-कन्हान परिसरातील झोपडी वजा घर कोसळले. घराचा भाग अंगावर पडल्यामुळे या घटनेत वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कमलेश गजानन कोटेकर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी यादवी कोटेकर या बाप-लेकीचा मृत्यू झाला.

Nagpur House Collapsed
Ahmednagar News: ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर; महिलेची रूग्णवाहीकेतच प्रसूती, नातेवाईक संतप्त

सुदैवाने या घटनेत कोटेकर यांची पत्नी थोडक्यात बचावली आहे. घरातील कर्ताव्यक्ती आणि मुलगी गेल्यामुळे कोटेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर कांदरी-कन्हान येथील गावकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी या परिसरातील वेकोली कंपनीकडून होणारी ब्लास्टिंग बंद करावी अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com