Akola News : 'लम्पी' चा धसका; पठाणपुरात जनावरांच्या बाजारास बंदी, जत्रा, प्रदर्शनावर निर्बंध

लम्पीबाबत प्रशासनाने शेतक-यांना मार्गदर्शन सुरु केले आहे.
Akola News, Lumpy Skin
Akola News, Lumpy SkinSaam tv
Published On

- हर्षदा सोनोने

Akola News : अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर शहरातल्या पठाणपुरा परिसरातील एका गाईला लम्पिस्किन विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी त्वचा रोगाने डोकं वर काढल्याच चित्र पाहायला मिळते. (Maharashtra News)

Akola News, Lumpy Skin
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

मूर्तिजापूर येथील गाईचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून 10 किलाेमीटर क्षेत्र बाधित घोषित करण्यात आल आहे. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मुर्तिजापूर येथील पठाणपुरा परिसरातील संसर्ग केंद्रापासून 10 किलाेमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Akola News, Lumpy Skin
Ambabai Temple Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनाबाबत पालकमंत्री केसरकरांचा माेठा निर्णय, भाविकांना...

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच किलाेमीटर परिसरातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती जगदीश बकतूरे (उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com