Sangli Accident: रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कारची रस्त्यावरील दुभाजकाला धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

Sangli Accident : कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात सांगलीमधील शिरढोणच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर झाला.
Sangli Accident
Sangli AccidentSaam Tv

(विजय पाटील, सांगली)

Car Hits Road Divider, 3 People Died :

सांगलीच्या शिरढोण येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जण जागीच ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झालाय. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ भरधाव वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.(Latest News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेले वाहन सांगोल्याहून कोल्हापूरकडे जात होते. या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्याकडेला असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. या कारमध्ये असणारे तिघेजण हे ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर मृतांमधील महिलेचे नाव राधा जाधव असून इतर दोन मृत पुरुष आणि जखमी व्यक्ती हे कोल्हापूरचे असल्याचे समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

तीन-चार दिवसापूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील ड्रीम हॉटेल जवळ ही घटना घडली होती. एका चारचाकीने काही तरुण भरधाव वेगाने समोर येत होते.

त्यावेळी अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी महामार्गालगत असलेल्या टेकडीवर जावून आदळली होती. अपघातावेळी कार फार वेगात होती, त्यामुळे चालकाचा कारवरील नियंत्रण सुटले कार टेकडीवर जाऊन आदळलीय.

Sangli Accident
Accident: भीषण अपघात! स्कॉर्पिओ आणि इनोव्हाची जोरदार धडक, कॉंग्रेस नेत्याच्या नातवाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com