पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेतीपंपाचाAgricultural pump वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. वीज पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी पंढरपूर - बीड राज्यमार्गावरState highway रास्तारोको आंदोलन केले आहे, दरम्यान आज सायंकाळ पर्यंत जर महावितरण ने शेती पंप वीज जोडणी केली नाही तर महावितरण अधिकाऱ्यांना उलट टांगण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.Farmers staged a road agitation on Pandharpur-Beed state highway
हे देखील पहा-
महावितरण कडून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीज पुरवठा पाच दिवसांपासून बंद केला आहे. थकीत वीज बिलापोटी शेत पंपाच्या वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पिके जळत आहेत. जनावरांना प्यायला पाणी नाही.
कोरोना काळCorona Period सुरु झाल्यापासून शेतपंपाची वीजबिले भरायची ठाकली आहेत अशातच ऊर्जामंत्र्यांनीMinister of Energy वीजबिलासाठी अधिकाऱ्यांकडून तगादा लावला जाणार नाही असं आश्वासनही दिल होत मात्र पुन्हा महावितरण ने करायचा तोच कारभार केला होता. अशातच आता वीजबिल भरले नाही म्हणून पंढरपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा पाच दिवसांपासून बंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर बीड रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांनी रोपळे गावात रस्ता रोको केला.
जवळपास दोन तास शेतकऱ्यांनी रस्ता अडवला. आज सायंकाळ पर्यंत जर महावितरण ने शेती पंप वीज जोडणी केली नाही तर महा वितरण कार्यालयात जनावरे बांधणार आणि अधिकाऱ्यांना उलटे टांगन्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.