Rasta Roko Andolan : शेतक-यांनी मालेगाव चाळीसगाव महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प (पाहा व्हिडिओ)

Malegaon : कळवाडी, चिंचगव्हाण, उंबरदे, देवघट, साकुर, दापोरे, नरडाणे या गावांसह चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावांत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे.
farmers rasta roko andolan at malegaon chalisgaon road for water
farmers rasta roko andolan at malegaon chalisgaon road for water saam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News :

गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याव्दारे गुरांच्या चा- यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आज (शनिवार) शेतक-यांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन छेडले. शेतक-यांनी मालेगाव चाळीसगाव महामार्ग रोखून धरला. यामुळे एक तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालेगाव तालुक्यातील कळवाडी, चिंचगव्हाण, उंबरदे, देवघट, साकुर, दापोरे, नरडाणे या गावांसह चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावांत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. परिणामी या भागात दुष्काळी (drought) परिस्थीती निर्माण झालेली आहे. (Maharashtra News)

farmers rasta roko andolan at malegaon chalisgaon road for water
Eknath Shinde : वढु ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार, आज हाेणार माेठी घाेषणा?

गिरणा धरणात 57 टक्के इतका जलसाठा असुन साधारणतः १२००० ते १३००० क्यूसेक पाणी आहे. गिरणा धरणातुन नदीद्वारे जळगाव जिल्ह्याला ४ आवर्तन सोडण्यात येणार आहे. तरी धरणात जलसाठा पुरेसा असुन कळवाडीसह देवघट, दापुरे, साकुर, नरडाणे, चिंचगव्हाण, उंबरचे गावांसाठी पर्जन्य कमी झालेले असुन विहरींनी तळ गाठला असल्याने जनावरांसाठी चा-याचा प्रश्न बिकट झालेला आहे.

पांझण डावा कालव्यात देखील पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी करत महिला, लहान बालकांसह शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

farmers rasta roko andolan at malegaon chalisgaon road for water
FDA Nagpur : नागपुरात 92 हजार रुपयांचे चीज, पनीर सदृश पदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची माेठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com