Aurangabad : झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव; फुल उत्पादक शेतकरी हवालदिल

आज दिवाळी निमित्त बाजारपेठेत विविध प्रकारची फुलं विक्रीसाठी आलीत.
aurangabad, marigold
aurangabad, marigoldsaam tv

- नवनीत तापडिया

Aurangabad : लक्ष्मीपूजनासाठी राज्यात माेठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. झेंडू फुलांच्या दुकानांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान राज्यात सर्वत्र झालेला पाऊस आणि परतीच्या पावसाचा फटका यंदा झेंडूला बसला आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी झेंडू (marigold) खराब झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यात झेंडूला अपेक्षीत दर मिळाला नसल्याचे चित्र आहे. (Diwali Latest Marathi News)

औरंगाबाद शहरात यावर्षी दिवाळीत झेंडूच्या फुलांना कमी भाव मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक झाली. औरंगाबाद बाजार समितीत झेंडूच्या फुलांची 800 ते 900 क्विंटल आवक झाली. परंतु फुल उत्पादक शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला. (Maharashtra News)

aurangabad, marigold
Marigold : लक्ष्मीपूजनासाठीची तयारी सुरु; झेंडूला मागणी वाढली, दर गडगडला

दिवाळीला (diwali) झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. परंतु शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाला आहे. यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान त्यात फुलांना देखील भाव मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दुपारनंतर झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते असे चित्र शहरात (aurangabad) आहे.

Edited By : Siddharth Latkar

aurangabad, marigold
Diwali 2022 : नरकासुराचे दहनानंतर काेकणवासीयांनी तुळशीवृदांवना समोर फाेडलं 'कारिट'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com