Shaktipeeth Expressway : 'शक्तिपीठ' महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले, मुंबईत धडकणार मोर्चा

Shaktipeeth Highway Farmers Demand-महायुतीचा महत्वाकांक्षी असलेला शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकाऱ्यांनी विरोध केला होता, मात्र आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
12-districts farmers protest against shaktipeeth highway
12-districts farmers protest against shaktipeeth highwaysaam tv
Published On

रणजित माजगांवकर,साम टीव्ही

कोल्हापूर: सत्ताधारी पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला गोवा ते नागपूरपर्यंतचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बोलताना शक्तिपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची घोषणा करतो,नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही, असे विधान केले होते.

त्यानंतर निवणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दाखवल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे.यावरूनच आता शक्तिपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही हाणून पाडू , सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे असा आरोप शेतकर्‍यांनी केलेला आहेत. तसेच 12 मार्च रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन मुंबई येथील आझाद मैदानावर मोर्चा धडकवणार आहे असा निर्णय कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.

12-districts farmers protest against shaktipeeth highway
Kolhapur News: अवैध गर्भलिंग निदानचा भंडाफोड, डॉक्टर महिलेसह तिघांना अटक; आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच धक्कादायक प्रकार

शक्तीपीठ महामार्गा विरोधी संघर्ष समिती राज्यव्यापी बैठक

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. राज्य शासनाने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी केली असून, प्रशासन 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, या महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 12 जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी सहभाग घेतला असून, महामार्गाच्या विरोधात पुढील पावले उचलण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.

12-districts farmers protest against shaktipeeth highway
Kolhapur Crime News : नात्याला काळीमा! पैशांसाठी नातवाने केलं भयकंर कृत्य, आजीची हत्या करुन दागिने पळवले

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार

शक्तिपीठ महामार्गामुळे जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी कोल्हापूरमधील शाहू स्मारक येथे बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, १२ मार्च रोजी १२ जिल्ह्यांतील शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जर अधिकाऱ्यांनी जमिनींची मोजणी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पळवून लावू, असा तीव्र इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com