Nashik News : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या दोघांना अटक, म्हसरुळ पोलीसांची कारवाई

या गुन्ह्याचा पुढील तपास म्हसरुळ पोलीस करत आहेत.
mhasrul police station
mhasrul police stationsaam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik Crime News : दिंडोरी -पेठ लिंक रोडवरील साई मंदिराजवळ विनापरवाना, अवैध व बनावट किटकनाशके वाहतुक करताना नाशिक भरारी पथकाने छापा मारुन सुमारे ४ लाखपेक्षा अधिकची किटकनाशके जप्त केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीसांनी दाेघांना अटक केली आहे. (Maharashtra News)

mhasrul police station
Dasara Melava In Chaundi : धनगर आरक्षणासाठी चौंडीत दसरा मेळावा : बाळासाहेब दोलताडे

कृषी अधिकारी पंचायत समिती (निफाड) यांनी बनावट ग्राहक पाठवून परराज्यातून येणाऱ्या विनापरवाना, अवैध व बनावट किटकनाशकांची खरेदी करतो असे भासवले. नाशिक भरारी पथकाच्या जाळ्यात संशयीत ज्ञानेश्वर पंढरीनाथ चित्ते (राहणार दिंडोरी) तसेच महेश टर्ले (राहणार निफाड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.

mhasrul police station
Maratha Or Kunbi : मराठा की कुणबी? नितेश राणेंनी दिले मनोज जरांगेंना चर्चेचे निमंत्रण

सध्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना बनावट कृषी निविष्ठा विक्री करून फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देत बनावट कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांची माहिती शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे द्यावी.

याबाबतचे आवाहन मोहन वाघ (विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग) यांनी केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास म्हसरुळ पोलीस करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mhasrul police station
Shirdi Sai Baba Mandir : भाविकांनाे !शिर्डीतील साई मंदिर उद्या रात्रभर खुले राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com