Wardha Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; पोलिसांनी असा केला बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नेमकं काय आहे प्रकरण?

Fake Currency Gang Mastemind Arrested: बनावट नोटा प्रकरणांत पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक केली.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam tv

चेतन व्यास

Wardha News : बनावट नोटा चलन करणाऱ्या चौघांना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक केली.

अखेर अंकुशने बनावट नोटा इंदोर येथून आणल्याचे समोर येताच पोलिसांनी थेट इंदोर गाठून बनावट नोटांचा मास्टर माईंड ओमप्रकाश भगवान लालवानी (२३) याला अटक केली. बनावट नोटा चलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकून टोळीचा पर्दाफाश केला. (Latest Marathi News)

Wardha Crime News
Bhandara News : आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, 'मला आशीर्वाद द्या'; घराबाहेर पडला तो परतलाच नाही

काही तरुण बनावट नोटा चलणात आणत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी दिनेश तुमाने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी निखील लोणारे, स्वप्नील उमाटे, प्रितम हिवरे, साहील साखरकर यांना १७ मार्च रोजी अटक केली होती.

त्यांच्याकडून तब्बल ५०० रुपयांच्या ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यांनी दिल्ली येथील राज नामक व्यक्तीने ५० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले.

Wardha Crime News
Chhattisgarh Crime News: लग्नातला आहेर जीवघेणा ठरला! गिफ्ट उघडताच घडलं भयंकर, नवरदेवासह भावाचा दुर्देवी मृत्यू; घातपात...

पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन दिल्ली येथून अंकुश कुमार मनोज कुमार (२०) याला २३ मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिस कोठडी दरम्यान त्याने बनावट नोटा ओमप्रकाश भगवान लालवानी रा. इंदोर याने पुरविल्याची माहिती दिली. पोलिसांनी इंदोर येथे जात मास्टरमाईंड ओमप्रकाश याला अटक केली.

वर्ध्यातील चार आरोपींची दिल्ली येथील अंकुश कुमार याच्याशी इन्स्टाग्रामवर दिसलेल्या एका ‘फेक करन्सी्’ पेजवरुन ओळख झाली. बनावट नोटांबाबतची माहिती चारही आरोपींनी त्याच्याकडून घेतली. त्यानंतर ते अॅप बंद केले. दिल्लीतील अंकुश सोबत वर्ध्यातील चार जणांनी मोबाईलवर संभाषण केले. त्यांना बनावट नोटा पुरविल्या.

तसेच दिल्ली येथील आरोपी अंकुश याची इंदोर येथील मुख्य सुत्रधार असलेला ओमप्रकाश याच्याशी देखील इन्स्टाग्रामवरुनच ओळख झाली होती. हा सर्व तपास करताना पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. मात्र, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन टोळीचा पर्दाफाश केला.

Wardha Crime News
Punjab Crime News: पोलिस अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य! पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; सर्विस रिव्हॉल्व्हरने थेट...

पोलिसांनी इंदोर येथे जात बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप, दोन कलर प्रिंटर, ५,५०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच ५०० रुपयांच्या ४२८ बनावट नोटा २ लाख १४ हजार रुपये जप्त केले. तसेच दिल्ली येथील आरोपीकडून १ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे.

बनावट नोटा या इतर देशांतून येत असल्याने तसेच नोटा तयार करणाऱ्या कागदाची आरोपी ओमप्रकाश याने ‘टेलिग्राम’ अँप डाऊनलोड करुन त्या ग्रुपवर मेसेज टाकून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.

नोटा बनविण्यासाठी लागणारा कागद हा इतर देशातून येत असल्याचा संशय असल्याने तसेच इतर देशांसोबत याचे धागेदोरे असल्याने हा तपास एनआयए तसेच एटीएसकडे सोपविणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com