Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

Fake Appointment Scandal: नंदुरबारमध्ये शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनुकंपा धारकाने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती
Fake Appointment Scandalsaam tv
Published On

Summary -

  • नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाने बनावट कागदपत्रांवर आधारित नियुक्ती केली असल्याचा प्रकार समोर आला.

  • रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपा धारक सागर इंगळे यांच्याऐवजी दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आली.

  • प्रशासनाने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने सागर इंगळे आणि त्याच्या कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केले.

  • न्याय मिळेपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचा त्यांनी स्पष्ट इशारा दिला.

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती केल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या अनुकंप धारकाला संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आली आहे. फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती
Education News: मोठी बातमी! तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आला आहे. शहादा तालुक्यातील एका संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपा धारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंप धारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार वर्षांपासून अनुकंप धारकांची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंप धारक सागर इंगळेला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती
Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

अनुकंप धारक वारंवार यासंदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आपल्या परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंपधारकावर आली आहे. जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश, संस्थेवर कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्र अनुकंप धारक सागर इंगळे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. या बोगस कारभाराची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती
Maharashtra Education Scam: 680 शिक्षकांना अटक होणार? बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com