Maharashtra Education Scam: 680 शिक्षकांना अटक होणार? बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले

Shalarth ID Scam: राज्यातील 680 शिक्षकांना अटक होण्याची शक्यता आहे... कारण एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झालीय.. मात्र साम टीव्हीनं सातत्याने पाठपुरावा केलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे? आणि किती बोगस शिक्षक आढळून आलेत?
Maharashtra SIT investigation reveals 680 bogus teachers linked to fake Shalarth IDs. Cyber police confirm large-scale education scam. Arrests of teachers and officials expected soon.
Maharashtra SIT investigation reveals 680 bogus teachers linked to fake Shalarth IDs. Cyber police confirm large-scale education scam. Arrests of teachers and officials expected soon.Saam Tv
Published On

साम टीव्हीने उघड केलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय.. सायबर पोलिसांनी तपासलेल्या 1 हजार 80 पैकी 680 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय...त्यामुळे सर्वच बोगस शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारने दिलेत.. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत...

सरकारने बोगस शालार्थ आयडी बनवलेल्या शिक्षकांना अटक करण्याचे संकेत दिले असले तरी हा घोटाळा कसा उघड झाला? त्याची मोडस ऑपरेंडीच साम टीव्हीने उघड केलीय...नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या समितीने 233 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचा अहवाल दिला....त्याआधारेच 12 मार्चला सायबर पोलिसांकडे पहिला गुन्हा दाखल झाला.. आणि चौकशीचं चक्रं फिरायला सुरुवात झाली..या प्रकरणात एसआयटीने निलेश वाघमारेला अटक केलीय... आणि एसआयटीने आणखी चौकशी केली.. यात सायबर पोलिसांनी 1 हजार 80 शालार्थ आयडींची तपासणी केली.. त्यापैकी तब्बल 680 शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय.. या प्रकरणी आतापर्यंत शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय.. मात्र माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे अजूनही फरार आहे...

हा घोटाळा फक्त नागपूर विभागापुरताच मर्यादित नाही... तर या घोटाळ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला पोखरलंय... त्यामुळे फक्त 1 हजार 80 शालार्थ आयडीपैकी 680 बोगस आयडी आढळले असतील तर राज्यभरात शालार्थ आयडीच्या माध्यमातून किती बोगस शिक्षक असतील? याची कल्पनाच न केलेली बरी... त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील बोगसगिरीचा पर्दाफाश होईपर्यंत साम टीव्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करुन बोगस शिक्षण खात्याची पोलखोल करत राहणार, हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com