Education News: मोठी बातमी! तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

3rd to 10th Std Education Syllabus Change: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तिसरी ते १०वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे.
Education News
Education NewsSaam Tv
Published On
Summary
  • तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचा बदल

  • राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे

  • पाठ्यक्रम आणि विषयांमध्येही बदल करण्यात आला आहे

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे.

एससीईआरटीकडून (SCERT) इयत्ता तिसरी ते दहावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. आराखड्याचा मसुदा तयार करून पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांना देण्यात आला आहे. हा मसुदा www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Education News
SCC, HSC Exam Timetable: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पटकन चेक करा

कसा आहे हा नवीन मसुदा? (3rd to 10th std Curriculum Change )

  • इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या 'परिसर अभ्यास' (भाग-एक आणि दोन) विषयाऐवजी 'आपल्या सभोवतालचे जग (भाग एक आणि दोन) हा विषय असणार आहे.

  • भाग एकमध्ये विज्ञान आणि भूगोल विषयातील आशयाचा समावेश असणार आहे तर

  • भाग दोनमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशय असणार आहे.

  • इयत्ता चौथीसाठी 'शिवछत्रपती' हे पाठ्यपुस्तक कायम ठेवण्यात आले आहे.

इयत्ता सहावीपासून इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांसाठी, तर इयत्ता नववीपासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पाठ्यपुस्तक आणि धडे असणार आहे.

Education News
10th SSC Result: दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी, बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

इयत्ता अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) अंतिम केल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या आधारे अभ्यासक्रम निश्चित केला आहे. इयत्ता सहावीपासूनच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवासह कृषी, कुक्कुटपालन, बागकाम, मेकेट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, लाकूडकाम, पर्यटन अशा रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे.

Education News
UPSC Exam Timetable: यूपीएससी परीक्षेचं वेळापत्रक समोर, २०२६ मध्ये होणाऱ्या २६ परीक्षांच्या तारखा जाहीर, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com