गडचिरोलीत एकापाठोपाठ एका हत्तींच्या मृत्यूमुळे खळबळ आणि संताप!

महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोलीच्या कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गडचिरोलीत एकापाठोपाठ एका हत्तींच्या मृत्यूमुळे खळबळ आणि संताप!
गडचिरोलीत एकापाठोपाठ एका हत्तींच्या मृत्यूमुळे खळबळ आणि संताप!Saam Tv
Published On

गडचिरोली : महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोलीच्या कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली. तीन ऑगस्टला 'सई' नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. त्या हत्तीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय हे अजूनही कळले नाही त्याचा शवविच्छेदनAutopsy अहवाल येण्यापूर्वीच आज आणखी एका हत्तीचा मृत्यूDeath झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.Excitement over the death of one elephant after another in Gadchiroli

आज अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव 'अर्जुन' असून मंगला या हत्तीणीने 15 जानेवारी 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचा जन्म झाला होता. त्या हत्तीचे नाव 'अर्जुन' असे नाव ठेवले होते. जवळपास तीस महिन्यांचा या अर्जुनचा नेमका कशाने मृत्यू हे सुध्दा कळाल नाही, अर्जूनच्या मृत्यूबद्दल गुपित असतानाच आज अजून एका हत्तीचा मृत्यू होणं धक्कादायक आहे.

२९ जून २०२० रोजी 'आदित्य' नावाच्या ४ वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला. अनेक मृत्यूनंतरही इथल्या कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष.वारंवार ह्त्ती मरत असून प्रशासन कोणावरती राही कारवाई करत नाही तसेच यांच्या मृत्येचे गुढ काय आणि ते कशामुळे मरण पावले आहेत याचा अहवाल लवकर देण्यात यावा अशी प्राणीप्रेमींकडून मागणी होत आहे. त्यामुळे आता या हत्तींच्या मृत्यूंची कारणं नेमकी काय याकडे सर्वांच लक्ष लागून राहील आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com