10th Board Exam: सामचा दणका! पेपर फोडणाऱ्यांना बेड्या; यवतमाळमध्ये केंद्र संचालकाचाच कारनामा

Special Report: मागच्या काही दिवसांपासून सातत्यान पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. दहावीचा पहिलाच पेपर फोडल्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर आता जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणात धडक कारवाई सुरू केलीय.
Special Report
10th Board ExamSaam Tv
Published On

Exam Scam: दहावीचा पहिलाच पेपर फोडल्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर आता जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणात धडक कारवाई सुरू केलीय. ज्या शाळेत पेपर फोडला त्या बदनापूरच्या शाळेतल्या कर्मचाऱ्यासह दोन झेरॉक्सवाल्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मराठीचा पेपर सुरू असतानाच प्रश्नपत्रिका (Question paper)आणि त्याची उत्तर लिहून झेरॉक्स सेंटरवर विकल्या जात असल्याचा साम टीव्हीन पर्दाफाश केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. थेट औरंगाबादच्या विभागीय कार्यालयापासून ते पुणे बोर्डाच्या मुख्यालयापर्यंत सर्वांचीच धावपळ झाली होती. त्यानंतर तातडीनं य़ा प्रकरणाची चौकशी सुरू केली. आणि काही तासांत कृष्णा शिरसाठ , अजय निकाळजे, अविनाश अंभोरे या तीन जणांना अटक करण्यात आली. तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. आता या प्रकरणी आणखी शाळेतली बडी धेंडं सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

यवतमाळच्या महागावमध्ये तर थेट केंद्र संचालकांनीच पेपर फोडल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आलीय. हा पेपर आधी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी झालेल्या १२ वीच्या गणिताच्या पेपरला अनेक ठिकाणी कॉप्या पुरव्या गेल्याचा धक्कादायक(Shocking) प्रकार समोर आला. विशेष म्हणजे यात शाळांमधले शिक्षक आणि कर्मचारीच सहभागी असल्याचं उघड झालं. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची घोषणा केवळ फार्स ठरणार की पुढच्या परीक्षा पारदर्शी होणार ? याकडे लक्ष लागलंय.

Special Report
Special Report: सुधारित पेन्शन योजनेचं गिफ्ट !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com