Sharad Gosavi : १०वीचा पेपर फुटलाच नाही, बोर्ड अध्यक्ष शरद गोसावींचा दावा, पण एक तासापूर्वीच प्रश्नपत्रिका...

Chairman of Board Sharad Gosavi on Paper Leak Case : महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी १०वीचा मराठीचा फुटलेला पेपर अन् परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळे असल्याचा दावा केला आहे.
Education Board Chairman Sharad Gosavi
Education Board Chairman Sharad Gosavi SaamTV
Published On

पुणे : राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडल्याचं दिसत आहे. १०वी बोर्डाच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला असल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना आणि यवतमाळमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर मराठीचा पेपर व्हायरल झाला आहे. जालन्यामध्ये पहिल्याच १५ मिनिटात मराठीचा पेपर फुटला होता, त्यानंतर हा पेपर यवतमाळमध्येही व्हायरल झाला.

यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी १०वीचा मराठीचा फुटलेला पेपर अन् परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळे असल्याचा दावा केला आहे. तर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलाय.

Education Board Chairman Sharad Gosavi
Pune News : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणात किडे; फोटो व्हायरल

शरद गोसावी नेमकं काय म्हणाले?

पेपरफुटी या प्रकाराचं मी पूर्णपणे खंडन करतो. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना, संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं दाखवलं जातंय, तिथे जे पेपर व्हायरल झाले आहेत. त्याचा आणि प्रश्नपत्रिकेचा काहीही एक संबंध नसल्याचं गोसावी यांनी सांगितलं. पुन्हा ते म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांनी मला ती पाने देखील पाठवले आहेत. त्या पानांचा आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. त्याबद्दल अधिक माहिती तसेच रिपोर्ट आम्ही घेत आहोत, असं म्हणत गोसावी यांनी या प्रकाराचं खंडण आणि पेपर फुटला नसल्याचा दावा केलाय

मात्र, एक तासाआधीच सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका 'साम टीव्ही'च्या हाती लागली होती, पण ती प्रश्नपत्रिका 'साम'ने दाखवली नसल्याची काळजी घेतली. दरम्यान, 'साम टीव्ही'ने त्याबाबत पडताळणी केली असता सत्य प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेत काहीही फरक नसल्याचं समोर आलं.

Education Board Chairman Sharad Gosavi
Chhaava : गणोजी शिर्के यांनी गद्दारी केली याचे पुरावे कुठे आहेत? 'छावा' वादाच्या कचाट्यात, शिर्के घराण्याचा आक्षेप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com