Eknath Khadse : फडणवीसांसोबत चांगले संबंध, मतभेद मिटू शकतात,खडसेंकडून दिलजमाईचे संकेत

Eknath Khadse News : एकनाथ खडसे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत देण्यात आलेत. तात्विक मदभेद असतात ते मिटूही शकतात, असे वक्तव्य खडसे यांनी केलेय.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv
Published On

Eknath Khadse On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो, मात्र सरकारविषयी भूमिका आली तर व्यक्तिगत एकमेकांशी वैर नसते. राजकारणामध्ये मी अनेकवेळा भूमिका बदलली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी राष्ट्रवादीमध्ये होतो, परत भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस व मी एकत्र काम केलं आहे . तात्विक मदभेद असतात ते मिटूही शकतात असे दिलजमाईचे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे .

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते, ते आजही आहेत. पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद मिटूही शकतील, असे सांगत एकनाथ खडसे यांनी दिलजमाईचे संकेत दिले आहेत. आमचं भारत-पाकिस्तान सारखं युद्ध चालले नाही. एकमेकांविषयी आमच्यामध्ये काही वेळ तणाव असू शकतो. राजकारणात काही भूमिका वेळेनुसार बदलाव्याही लागतात, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

महायुतीच्या विजयावर काय म्हणाले ?

महायुतीला एवढं घवघवीत यश मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी कमी झाली नाही. अनेक विषय घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भूमिका मांडली. परंतु, महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण ही योजना त्यांनी जाहीर केली. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 7500 त्यांनी तीन महिन्यात टाकले. 7500 महिलांच्या खात्यावर जमा झाले, एक प्रकारे त्यांनी लाडक्या बहिणी त्यांना मत दिलं. महिलांना अप्रत्यक्षपणे त्यांनी लाचच दिलेय, असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

Evm घोटाळा विरोधी आमदार शपथ नाकारली

Evm वर अनेकांनी शंका व्यक्त केली. काही उदाहरणे आहेत ते ईव्हीएम वर शंका उपस्थित करणारी आहेत. ते काहीतरी गडबड घोटाळा झालाय, याला बळकटी देणारे आहेत. रोहिदास पाटील यांच्याच गावात त्यांना शून्य मतं मिळाली. कोणीतरी त्यांचा आधार असेल किंवा त्यांनी त्यांना मत देत असेल या ठिकाणी असे चित्र यावेळी दिसून आले. उमेदवाराच्या गावातच त्याला मत मिळालं नाही, जानकरांनी याबाबत प्रश्न उपस्थित केलाय, असेही खडसेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com