जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा, चौघांवर गुन्हा

नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची लाखो रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे.
Aarvi Police station
Aarvi Police station saam tv
Published On

चेतन व्यास

बुलडाणा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवत तिघांना गंडा घातल्याचा (Money fraud crime) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने नोकरीचं देण्याचा आमिष तीन जणांना दाखवलं. त्यानंतर त्या व्यक्तीने तिघांकडून तब्बल १८ लाख ५० हजार रूपये उकळले. पैशांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी (Police case filed) चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आर्वीतील एका, चंद्रपुरामधील दोन आणि अमरावतीच्या एका आरोपीचा समावेश आहे. नरसिंग रामेश्वर सारसार,रजनी अंबादास चौधरी,पंकज हरिदास झोडगे आणि अंबादास चौधरी अशी आरोपींची नावं आहेत. (Wardha latest crime news update)

Aarvi Police station
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे नाव काय असणार? मुख्यमंत्र्यानी घेतला 'हा' निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी येथील नरसिंग सारसर या व्यक्तीने आर्वी येथीलच रितेश राजेश टाक या तरुणाला बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नोकरी देतो, त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. रजनी चौधरी या वर्ध्याला येणार असल्याचे कळताच नरसिंगसोबत रितेश वर्ध्याला ५० हजार रुपये घेऊन गेला.वर्ध्यातील एका बॅंकेजवळ त्यांनी फॉर्म भरुन पासपोर्ट फोटो घेतले.दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली.ते पैसे देखील रितेशने दिले.

Aarvi Police station
वेदांता प्रकल्पावरुन राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, उगाच बढाया मारू नये...

मात्र,पैसे दिल्यानंतरही नोकरी न लागल्याने रितेशने विचारणा केली. रजनी चौधरी यांनी सध्या बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जागा रिकामी नाही,असे सांगितले. काही दिवसांनी पंकज झोडगे याने नरसिंग सारसर यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश रितेशला देण्यासाठी दिला. मात्र, चेक खोटा असल्याचं समोर आल्यावर फसवणूक झाल्याचं सदर व्यक्तीला समजलं.

काही दिवसांनी आर्वी येथील सावरकर नामक युवकाला देखील नोकरीचे आमिष देऊन ८ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. तसेच विरसिंग सारसर या व्यक्तीलाही ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कळले.याप्रकरणीपोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com