वेदांता प्रकल्पावरुन राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, उगाच बढाया मारू नये...

'अडीच वर्ष बंद खोलीत राहून तडजोडी केल्या आणि त्यामुळेच हे उद्योग गेले.'
Narayan Rane Vs Sharad Pawar
Narayan Rane Vs Sharad PawarSaam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: राज्यात सुरु असलेल्या वेदांता प्रकल्पाच्या वादावरुन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेंव्हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का झाली नाही, उगाच बडाया मारु नये, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारल्या असता ते बोलत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, 'सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटरचा समुद्रकिणारा लाभला असून हा पर्यटन जिल्हा आहे. त्या ठिकाणी मिनी ट्रेन सुरू व्हावी, कोकण रेल्वेने खर्चाचा अंदाज तयार केला आहे. त्या बाबतच्या रक्कमेची तरतूद बजेटमध्ये घ्यावी ही विनंती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) भेटलो असल्याचं राणेंनी सांगितलं.

तसंच वेदांत फॉक्सकॉन हा जो वाद सुरु आहे मी त्यात नाहीये. पण उद्योग कोणामुळे गेले हे मला माहित आहे. आमचे उद्योग मंत्री , मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ते सक्षम आहेत माझा त्यात सहभाग नाही. पण मी महाराष्ट्राच्या बाजूने आहे.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, विरोधकांना काही काम नाही. अडीच वर्ष बंद खोलीत राहून तडजोडीच केल्या आणि त्यामुळेच हे उद्योग गेले. वैयक्तीत फायद्याच्या तडजोडीमुळे आणि मागील अडीच वर्षात पोषक वातावरण राज्यात नसल्यामुळेच हे उद्योग गेले. त्यामुळे आता हात चोळत बसण्यापेक्षा दुसरं काम नाही. आम्ही आता सक्षम असल्याचही ते यावेळी म्हणाले.

तसंच नवं सरकार बसू तर द्या; आपण चार वेळा ते मुख्यमंत्री होते तेंव्हा महाराष्ट्रात उद्योगिक क्रांती का घडली नाही. मागील अडिच वर्ष त्यांचे मुख्यमंत्री हात चोळत मातोश्रीत का होते. उगाच बढाया मारू नये गप्प बसा राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

तर मुख्यमंत्री २४ तास फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतात. त्यामुळे अजित पवारांनी गैरसमज करण्यापेक्षा समज पसरवण्याचे काम केले तर लोकशाहीमध्ये महाराष्टात विरोधी पक्षाच चांगलं काम होईल असं प्रत्युत्तर अजित पवारांना दिलं. शिवाय आम्ही संगठना मानत नाही, आम्ही आंदोलकांना जुमानत नाही. नाणार प्रकल्प होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com