नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (Adv. satish Uke) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने काल (३१ मार्च, गुरुवारी) पहाटे ५ वाजता छापा (Raid) मारला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांची २ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अॅड. सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अॅड. सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना रात्रभर नागपूर विमानतळाच्या आत बसवून ठेवले होते. रात्रभर अधिकाऱ्यांनी उके बंधूंची विमानतळावरच चौकशी केली. ईडीचे अधिकारी उके बंधूंना काल रात्री 11.20 च्या विमानाने मुंबईत नेण्यासाठी नागपूर विमानतळावर आले होते, मात्र त्यांना रात्री न नेता सकाळी मुंबईला नेण्यात आले. (Adv. Satish Uke ED Raid News)
हे देखील पहा -
कोण आहेत अॅड. सतीश उके?
सतिश उके हे नागपुरातील (Nagpur) प्रसिध्द वकील आहेत. नागपुरातील पार्वतीनगर भागातील निवास्थानी ईडीने पहाटे 5 च्या दरम्यान धाड टाकली. उके यांच्या घरी त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय आहेत. एका जमीन व्यवहार प्रकरणी त्यांच्यावर धाड टाकल्याचे बोलले जात आहे. ईडीने (ED) तब्बत सहा तास त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात त्यांनी सतिश उके यांचा लॅपटॉप जप्त केला आहे. ईडीने उके यांनाा ताब्यात घेतलं आहे.
उके यांनी सातत्याने भाजप (BJP) नेत्यांविरोधात खटले चालवित आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात खटले चालवीत आहेत. तसेच नाना पटोले यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात उके ते त्यांच्या बाजूने लढताहेत. त्यामुळे ही ईडी (ED) ने कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, उके यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने हा छापा टाकल्याचं बोललं जातं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.