ED Raid: राज्यभरात ईडीची मोठी कारवाई! मुंबई, ठाणे, जळगावमधून तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त

ED Raid Latest News: जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
ED raids In Maharashtra
ED raids In Maharashtra Saam TV
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी

ED Raid News:

ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

या कारवाईमध्ये जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी  आहे.

ED raids In Maharashtra
Maharashtra Politics: दीर्घ दुराव्यानंतर शिवसेना-समाजवादीची एकजुट; मुंबईतील बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब?

दरम्यान, ईडीकडून याआधीही जळगावमधील राजमल लाखीचंद ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असलेल्या या ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापा टाकण्यात आला होता. यावेळी तब्बल २४ तासांपासून अधिक काळ दुकानाची चौकशी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com