पंढरपूर - राज्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात गेल्या सात वर्षांपूर्वी मी ED, Income Tax आणि सीबीआयकडे CBI तक्रारी केल्या आहेत. परंतु त्या तक्रारींवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र सध्या राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेल Blackmail करण्यासाठी इन्कम टॅक्स कडून धाडी टाकल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत मोदी सरकारचा Modi Goverment तो एक स्टंट असल्याचं वक्तव्यं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.(ED, Income Tax raids to blackmail leaders; Raju Shetty accuses Modi government)
हे देखील पहा -
या सर्व तपास यंत्रणांनी टाकलेल्या धाडींचे पुढे काय होतं हे मात्र कोणालाच कळत नाही मग या धाडी टाकून उपयोग काय असा सवाल उपस्थित करत या धाडी टाकून केवळ मांडवली करतात की काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी FRP मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghatana राज्यभरात शेतकरी मेळावे घेतले जात आहेत. आज पंढरपुरातील शेतकरी मेळाव्यासाठी Pandharpur Farmers Meet राजू शेट्टी Raju Shetty आले होते. शेतकरी मेळाव्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्या कारखान्यावर व मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने टाकलेला धाडीवर बोलताना धाडी टाकून सरकार मांडवली करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे साखर कारखाने Sugar factories लूटणाऱ्यां सोबत जाणार नाही असे यावेळी राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
लखीमपूर घटना दुर्दैवी आहे.
लखीमपूर Lakhimpur घटना दुर्दैवी आहे या घटनेच्या विरोधात जर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद From MVA Maharashtra Bandh केला जाणार असेल, तर आम्ही देखील या बंद मध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्या कारखान्यांनी अद्यापही FRP रक्कम दिली नाही असे कारखाने सुरू होणार असतील तर या कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून कारखाने बंद पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.