"प्रतिभावंतांचा साहित्य संवाद"च्या अध्यक्षपदी डॉ. संजय बोरुडे

डॉ. संजय बोरूडे, अहमदनगर.
डॉ. संजय बोरूडे, अहमदनगर.
Published On

अहमदनगर : अमरावती येथील संत गाडगे बाबा मंदिर सभागृहात २३सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रतिभा साहित्य संघाच्या जिल्हा व शहर कार्यकारीणीच्या वतीने प्रतिभावंतांचा साहित्य संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नगर येथील नामवंत साहित्यिक, कविवर्य डाॅ. संजय बोरूडे हे असून स्वागताध्यक्षपदी जिल्हा कार्यकारिणीचे सचिव नितीन पवित्रकार यांची निवड करण्यात आली आहे. Dr. Sanjay Borude elected as President of Amravati Sahitya Sammelan

"राजकारण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून या दोहोंचे प्रतिबिंब साहित्यिकांच्या साहित्यात उमटत असतात. त्या करीता प्रतिभा साहित्य संवाद समारंभाकरीता स्थानिक साहित्यिक मंडळी सोबतच महाराष्ट्र राज्याच्या तसेच अमरावती जिल्ह्याच्या विकासात मौलिक कामगिरी करणाऱ्या आजी-माजी राजकीय पदाधिकारी यांनाही सादर निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताध्यक्ष मंगेश वानखडे, जिल्हाध्यक्ष राजेन्द्र ठाकरे ,जिल्हा सचिव नितीन पविञकार यांनी नुकत्याच पार पडलेल्या नियोजन सभेत दिली.

यावेळी अध्यक्ष विठ्ठल कुलट, सचिव विजय सोसे, अकोला जिल्हाध्यक्ष अरूण काकड,शहर अध्यक्ष संदीप देशमुख, सचिव सूर्यकांत बाजड,उपाध्यक्ष व लेखक गजानन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या समारंभात कांचन मुरके यांच्या तसेच संदीप देशमुख यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा तसेच संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांच्या 'सत्तेत होरपळणारी सत्यवान माणसं' या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय कार्यकारीणी सचिव विजय सोसे हे हितगुज साधतील. प्रकट मुलाखत, नवनियुक्त कार्यकारीणीचा सत्कार आणि कविसंमेलन असे या कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे.

डॉ. संजय बोरूडे, अहमदनगर.
मंत्री थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांची मोर्चेबांधणी

बोरूडेंची १५ पुस्तके

प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने या दोन दशकात १४ राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन पार पडले आहेत. यामध्ये साहित्य,सांस्कृतिक, शिक्षण, शेती, सामाजिक तथा पर्यावरण क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना 'लोककवी डाॅ. विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार, स्व.बापूराव पाटील तुरखडे उदीम पुरस्कार, डाॅ. आ. ह. साळुंखे प्रतिभा गौरव पुरस्कार तसेच प्रतिभा कर्मदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अ. नगर, साहित्याक्षर प्रकाशन, पारनेर साहित्य साधना या संस्थांनी अभिनंदन केले आहे. डॉ. संजय बोरुडे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यिक आहेत. त्यांची १५ पुस्तके व दोन ई बुक्स प्रकाशित आहेत. त्यांच्या कथा, कविता विविध विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. Dr. Sanjay Borude elected as President of Amravati Sahitya Sammelan abn79

हा नगरचा सन्मान

नगरच्या वाट्याला हा सन्मान आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 'विदर्भाच्या लोकांनी माझ्या साहित्याला जे प्रेम दिले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

- प्रा.डॉ. संजय बोरूडे, ख्यातनाम साहित्यिक, अहमदनगर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com