मंत्री थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांची मोर्चेबांधणी

राधाकृष्ण विखे पाटील- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
राधाकृष्ण विखे पाटील- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Published On

अहमदनगर : संगमनेर तालुका ठेकेदार चालवतात. आगामी नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार, ठेकेदार संस्कृती जनतेसमोर मांडून वास्तव समजावून सांगा, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे हे होम ग्राऊंड आहे. ते काबीज करण्यासाठी विखे पाटील यांनी रणनीती आखली आहे.

संगमनेरात भाजप कार्यकर्त्यांच्या वज्रनिर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, की ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले. टीका होऊ लागल्यावर अधिकाऱ्यांसमवेत बागेत फोटो काढून आढावा घेतल्याचे जाहीर केले. Strategy from Vikhe Patil in Sangamner constituency

राधाकृष्ण विखे पाटील- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Ajit Pawar | अजित पवार किरीट सोमय्या प्रकरणावर काय म्हणतायत पाहा | Kirit Somaiya

सर्वांत जास्त खासगी कोविड सेंटरच्या माध्यमातून संगमनेरात रुग्णांची सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. घुलेवाडीचे कोविड सेंटर इच्छामरण हवे असणाऱ्यांसाठी होते. रुग्ण खासगी व्यवस्थेच्या भरवशावर सोडले होते. खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये बरे झालेले रुग्ण व मृत्यूबाबत लोकप्रतिनिधींनी श्वेतपत्रिका काढावी. मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवरेने ५० टक्के शुल्क माफ केले, मग संगमनेरने का नाही केले, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला. आपले हॉस्पिटल विकले गेल्यानंतर ३० वर्षांनंतर उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याचा टोला त्यांनी लगावला.

बूथ कार्यकर्त्यांनी आगे बढो, झिंदाबादच्या घोषणा देण्याऐवजी मैदानात उतरून नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणण्याच्या निर्धाराने सूक्ष्म नियोजन करावे. अंधारात उद्योग करणारे उघडे पडणार असून, तडजोडी करणाऱ्यांना संधी मिळणार नाही. भाजपची कामे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याची गरज असल्याचे सांगत कानपिचक्या दिल्या.

जालिंदर वाकचौरे, डॉ. अशोक इथापे, ॲड. श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, योगिराज परदेशी, जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, मेघा भगत, विक्रम खताळ, रोहीत चौधरी, वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ आदींसह भाजपचे विविध पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. Strategy from Vikhe Patil in Sangamner constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com